स्थापने व वर्षांची अधिकृत पडताळणी आवश्यक.
हवेली तालुक्यातील सहकार चळवळीच्या विकासामध्ये अनेक ज्येष्ठ सहकार नेते आणि कार्यकर्त्यांचे योगदान राहिले आहे. सहकार महर्षी कै. अण्णासाहेब मगर तसेच हवेली तालुक्यातील ज्येष्ठ सहकार नेत्यांच्या पुढाकारातून या संस्थेच्या उभारणीची वाटचाल सुरू झाल्याची माहिती उपलब्ध आहे.
संस्थेच्या सुरुवातीच्या कामकाजाचा पत्ता १०७, भवानी पेठ, पुणे असा नमूद आहे. त्यानंतर सन १९६६ मध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये भूखंड क्रमांक ४३८ ते ४४१ मिळाल्यामुळे संस्थेच्या कामकाजाला विस्ताराची संधी मिळाली.
काळानुसार सहकार क्षेत्रात अनेक बदल झाले. कृषी क्षेत्रातील गरजा, बाजारपेठेचे स्वरूप आणि शेतकरी हिताच्या आव्हानांनुसार सहकाराच्या माध्यमातून शेतकरी व संलग्न संस्थांना सहकार्य करण्याची भूमिका संघाने पुढे चालू ठेवली.